शिवाजी महाराज भाषण मराठी | Shivaji Maharaj Speech in Marathi

speech of shivaji maharaj in marathi | shivaji maharaj speech in marathi | shivjayanti speech in marathi | speech on shivaji maharaj in marathi | shivaji maharaj bhashan marathi | शिवाजी महाराज भाषण मराठी लेखन | शिवाजी महाराज भाषण | shivaji jayanti speech in marathi | shiv jayanti speech in marathi | शिवाजी महाराज भाषण कडक | shivaji maharaj bhashan in marathi | शिवजयंती भाषण | shivaji maharaj bhashan | chhatrapati shivaji maharaj speech marathi | शिवाजी महाराज छोटे भाषण | chhatrapati shivaji maharaj speech in marathi | shivaji maharaj speech | 19 फेब्रुवारी शिवजयंती भाषण

नमस्कार बंधू-भगिनींनो, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजनवर्ग तसेच उपस्थित सर्व शिवभक्त मावळ्यांनो, आज आपण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या घटनांची माहिती पाहणार आहोत.

Shivaji Maharaj Speech in Marathi | शिवाजी महाराज भाषण मराठी
Shivaji Maharaj Bhashan in Marathi

छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकले तरी उर भरून येते असे व्यक्तिमत्त्व.

“शिवरायांचे आठवावे रूप |
शिवरायांचा आठवावा प्रताप |
शिवरायांचा आठवावा साक्षेप |
भूमंडळी ||”

या समर्थ रामदास स्वामी यांनी म्हणून ठेवलेल्या ओळी हृदयात कोरुन ठेवाव्याशा वाटतात.

शिवरायांचे बालपण | Shivaji Maharaj Speech in Marathi

फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३० साली शिवनेरी किल्ल्यावर एका महापुरुषाने जन्म घेतला. त्या महापुरुषाचे नाव ठेवले गेले “शिवाजी“. शिवाजी या तीनच अक्षरांत फार मोठे सामर्थ्य दडले होते.

शिवरायांच्या आईचे नाव जिजाऊ आणि वडिलांचे नाव होते शहाजी. जिजाऊमाता फार प्रेमळ होत्या. त्यांनी शिवबांना लिहायला, वाचायला शिकवले. त्या शिवबांना रामायण आणि महाभारतातल्या गोष्टी सांगत. शहाजीराजे विजापुरात नोकरी करत असल्यामुळे शिवबांना घडविण्याचे काम आईला म्हणजेच जिजाबाईना करावे लागत असे.

शिवबांना खुप मित्र होते. त्यांच्या सोबत ते खेळ खेळत. ह्या मित्रांचे खेळही इतर लहान मुलांपेक्षा जगावेगळेच. कधी घोड्यावर बसावे, कधी रानावनात हिंडावे, तर कधी सवंगड्यात दोन गट पाडून लढाई करून एखादा किल्ला सर करावा. Shivaji Maharaj Speech in Marathi

जिजाबाईंकडे एक हुशार कारभारी होते ते म्हणजे दादोजी कोंडदेव. दादोजींच्या हाताखाली शिवबांचे सारे शिक्षण झाले. ते त्यांना घोड्यावर बसून जहागिरी फिरवत असत. त्यांनी प्रत्यक्ष बघून ह्या गोष्टी शिकाव्यात या हेतूनेच दादोजी त्यांना बरोबर नेत असत.

झुकणार नाही

Shivaji Maharaj Speech in Marathi: एके दिवशी शिवबा दहा वर्षांचे असताना त्यांची आई त्यांना घेऊन विजापुरला गेली. विजापुरला त्यांचे वडील शहाजीराजे सुलतान मुहम्मद आदिलशहाच्या दरबारात मोठे सरदार होते. एकदा शहाजीराजांनी शिवबाला त्यांच्या दरबारात नेले. त्यांनी बादशहाला मुजरा करण्यास सांगितले, पण शिवबा स्वाभिमानी होते. त्यांच्या वडिलांचे सांगणे त्यांना आवडले नाही. शिवबाने मुजरा करण्यास साफ नकार दिला. नुसतेच नाकारले नाही तर, एक आई भवानी खेरीज मी कुणापुढेच वाकणार नाही. असे बाणेदार उत्तर दिले आणि तेथून निघून गेले.

प्राणीप्रेमी राजे

एकदा एक भयानक प्रसंग घडला. एक खाटीक गाईला फरफटत ओढत घेऊन चालला होता. त्या खाटकाने भररस्त्यात गाईला थांबवले आणि कमरेचा सुरा काढला. खाटीक सुरा चालवणार, तेवढ्यात शिवबांनी आपल्या म्यानातील तलवार काढून त्या खाटीकाचा हातच कापला. दहा वर्षांच्या शिवबाने गाईचे प्राण वाचवले. भूतदया, प्राणीमात्रांवर दया करावी हे संस्कार त्यांच्या आईने त्यांच्यावर केले होते.

स्वराज्याची शपथ

शिवबांनी स्वराज्याची शपथ घेण्याचे ठरवले. त्यासाठी ते “राहिडा” नावाच्या किल्ल्यावरील रोहिडेश्वर या भगवान शंकराच्या देवळात आले आणि त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली. या ठिकाणी शिवबा समवेत त्यांचे सवंगडी तानाजी मालुसरे, येसाजी कंक, कान्होजी जेधे यांसारखे शूरवीर होते. रोहिडेश्वराला बेलपत्रे वाहून सर्वांनी ‘हर हर महादेव’ असा जयजयकार केला.

अफजलखानाचा वध

शिवरायांचा दरारा चोही बाजूला पसरत होता. त्यांनी अनेक किल्ले सर केले. फौज तयार केली. विजापूरच्या दरबारात खळबळ उडाली. शिवाजीचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे नाहीतर हा संपूर्ण आदिलशाही नष्ट करेल, असे वाटू लागले. यावेळी विजापूरचा कारभार आदिलशाहची आई बडीसाहेबा हिच्या कडे होता. तिला शिवबाचा खुप राग आला. त्यांनी शहाजीराजेंना आपल्या मुलाला समजून सांगा अशी विनंती केली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. Shivaji Maharaj Speech in Marathi

शिवाजी राजांना पकडण्यासाठी दरबारातील एक सरदार पुढे आला. त्याच नाव होत अफजलखान. त्याने शिवाजी महाराजांना पकडण्याचा विडा उचलला. तो अत्यंत क्रूर आणि कपटी होता. वीस हजारांचे सैन्य घेऊन तो विजापूरहुन पुण्याकडे निघाला वाटेत त्याने तुळजापूर, पंढरपूरच्या पेठा लुटल्याआणि मंदिरांचा विध्वंस करुन तो वाईला आला.

अफजलखानाची स्वारी म्हणजे शिवाजी राजांवरील मोठ संकट होत. पुणे सोडून राजांनी प्रतापगडावर जाऊन राहण्याचा निर्णय घेतला. राजांनी काही योजना आखल्या. त्यावेळेस वाईचा कृष्णाजी कुलकर्णी वकील हा स्वतःला विजापूरच्या दरबारातील स्वमिनिष्ठ मानकरी समजत होता. अफजलखानने त्याला शिवाजी राजांकडे पाठवले. तेव्हा त्याने शिवाजी राजांना विजापुरचे सर्व किल्ले परत करण्यास आणि शरण जाण्यास सांगितले.

शिवरायांनी आपला वकील पंताजी गोपीनाथ बोकील यांना अफजलखानाकडे पाठविले. आपण घाबरलो आहोत असा बहाणा केला. यानंतर खानाने शिवाजी राजांना प्रतापगडावर भेटण्यास बोलावले. शिवराय भेटण्यास तयार झाले.

शिवबाने प्रतापगडावर भव्य मंडप टाकला. सजावट केली. भेटीचा दिवस उजाडला. राजांनी स्नान केले. देवीचा आशीर्वाद घेतला. थोडे भोजन केले. खान काहीतरी दगा-फटका करणार म्हणून राजांनी अंगात चिलखत, पांढरा शुभ्र अंगरखा घातला, डोक्यावर जिरेटोप,कमरेला शेला त्यात कट्यार आणि हाताच्या बोटांत वाघनखे घातली. जिजाबाईना वंदन करून राजे अफजलखानाच्या भेटीसाठी निघाले. अफजलखान शामीयानात अगोदरच येऊन बसला होता. त्याच्या सोबत त्याचा अंगरक्षक सय्यद बंडा त्याच्याजवळ होता.

“आपले अंगरक्षक बाहेर पाठवा, शिवाजी आपल्याला घाबरत आहे” असे शिवरायांनी आपले वकील पंतोजी गोपीनाथ यांना अफजलखानला सांगण्यास सांगितले. खानाने अंगरक्षक बाहेर पाठविला. Shivaji Maharaj Speech in Marathi

राजे शांतपणे पावले टाकीत खानासमोर गेले. खान उभा राहिला आणि दोन्ही हात पुढे केले आणि म्हणाला “आओ सिवा! मेरे गले लग जाओ”. त्याने राजांना आपल्या मिठीत घेतल्यानंतर शिवाजी राजांची मान घट्ट दाबली आणि कमरेची कट्यार काढून शिवरायांच्या पोटात खुपसली. पण अंगात चिलखत असल्यामुळे त्यांना कोणतीही इजा झाली नाही.

त्याच वेळी शिवाजी राजांनी बिचवा काढला व खानाच्या पोटात खुपसला. हातातील वाघनखे खानाच्या पोटात खुपसून कोतळा बाहेर काढला. दगा झाला असे ओरडून खान जमिनीवर कोसळला. सय्यद बंडा हा आत धावत आला पण जिवा महाला ने त्याचा हातच कलम केला. संभाजी कावजी ने अफजलखानाचे मुंडके कापून गडावर नेले. गडावर तोफेचे आवाज झाले. झाडीत लपून बसलेले सैन्य बाहर आले आणि खानच्या सैन्यावर तुटून पडले.

ही बातमी विजापूरमध्ये कळली. दिल्लीत औरंगजेबाला धक्का बसला.

हे ही पाहा:
लोकमान्य टिळक भाषण मराठी | Lokmanya Tilak Speech in Marathi

Shivaji Maharaj Speech in Marathi हा लेख आपल्याला कसा वाटला , हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top