लोकमान्य टिळक भाषण मराठी | Lokmanya Tilak Speech in Marathi

Lokmanya Tilak Speech in Marathi | Lokmanya tilak information in marathi । लोकमान्य टिळक यांची माहिती निबंध मराठी । Lokmanya Tilak Essay in Marathi

लोकमान्य टिळक भाषण मराठी | Lokmanya Tilak Speech in Marathi

नमस्कार, माननीय अध्यक्ष महोदय, मंचावर उपस्थित सर्व पाहुणे, तसेच मान्यवर आणि माझ्या बंधू-भगिनींनो,

आपण आज लोकमान्य टिळक यांच्याबद्दल माहिती पाहणार आहोत. आपण यामध्ये त्यांचा परिचय, सुरुवातीचे जीवन, त्यांचे सामाजिक जीवन, राजकीय कारकीर्द, शिक्षण आणि त्यांच्या मृत्युबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

Lokmanya Tilak Speech in Marathi

लोकमान्य टिळक हे शिक्षक, थोर समाजसेवक, क्रांतिकारक आणि वकील होते. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!” अशी सिंहगर्जना त्यांनी दिली. लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे पहिले नेते होते. लाल बाल पाल या प्रसिद्ध त्रिमूर्ती पैकी एक म्हणजे ‘बाल’ (बाळ) हे लोकमान्य टिळक होते.

लोकमान्य टिळकांचे सुरुवातीचे जीवन

लोकमान्य टिळकांचे पूर्ण नाव “बाळ गंगाधर टिळक”. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी कोकणातील रत्नागिरी येथील चिखली या गावी हिंदू-ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई आणि वडिलांचे नाव गंगाधर होते. वडील गंगाधर टिळक हे शाळेत शिक्षक होते. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांचा विवाह झाला. लग्नाआधी त्यांच्या पत्नीचे नाव तापीबाई होते आणि लग्नानंतर ते बदलून सत्यभामाबाई ठेवले गेले. १८७१ मध्ये लग्नाच्या काही महिन्यांनंतर त्यांच्या वडिलांचे निधन झाले.

टिळकांनी पुण्यातील डेक्कन कॉलेजमधून गणित या कला शाखेतील विषयाची पदवी प्राप्त केली. नंतर त्यांनी एम.ए. करण्याचे ठरवले, पण ते शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी एल.एल.बी. करण्याचे ठरवले. 1879 मध्ये त्यांनी एल.एल.बी. ची पदवी प्राप्त केली. (Lokmanya Tilak Speech in Marathi)

पदवी प्राप्त केल्यानंतर ते नोकरीसाठी एका खाजगी शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. शाळेतील सहकार्यांशी वैचारिक मतभेदानंतर ती नोकरी सोडून ते पत्रकार झाले.

टिळकांचे समाजकारण

न्यू-इंग्लिश स्कूलची स्थापना:

टिळकांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात खऱ्या अर्थाने न्यू-इंग्लिश स्कूलच्या स्थापनेपासून झाली. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या प्रभावामुळे त्यांनी न्यू-इंग्लिश स्कूलची स्थापना गोपाळ गणेश आगरकर , महादेव बल्लाळ नामजोशी आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यासमवेत काही महाविद्यालयीन मित्रांसोबत केली. या शाळेचा हेतु भारतातील तरुणांचा शिक्षणाचा दर्जा सुधारणे हा होता. शाळेच्या यशानंतर त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना:

लोकमान्य टिळकांनी न्यू-इंग्लिश स्कूलच्या प्रेरणेतून १८८४ साली डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. याची स्थापना करुन टिळकांनी उत्तर शिक्षण योजना तयार केली, या सोसायटीने भारतीय तरुणांना राष्ट्रवादाचे धडे दिले. डेक्कन एज्युकेशन सोसायटीची मुख्य शाखा सध्या पुण्यात स्थित आहे.

केसरी या वृत्तपत्राची स्थापना:

4 जानेवारी 1881 रोजी लोकमान्य टिळकांनी केसरी वृत्तपत्राची स्थापना केली. केसरीच्या संपादकांमध्ये आगरकर यांनी केसरीचे पहिले संपादक म्हणून काम पाहिले, चिपळूणकर आणि टिळक यांच्यासह अनेक स्वातंत्र्यसैनिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा यात समावेश होता.(Lokmanya Tilak Speech in Marathi)

हे वाचा:
[100+] वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Happy Birthday Wishes in Marathi

टिळकांचे राजकारण

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस:

टिळकांनी 1890 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये रुजू झाले. टिळकांचे व्यक्तिमत्व जहाल असल्यामुळे त्यांना विरोध करण्यात आला. १९०५-१९०७ च्या च्या दरम्यान स्वदेशी चळवळीमुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये जहाल आणि मवाळ असे दोन गट पडले.

1897 मध्ये मुंबईपासून पुण्यापर्यंत प्लेगने हाहाकार माजवला होता. या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी ब्रिटिश सैन्य आणले गेले होते आणि प्लेगला आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना केली गेली होती. पण या उपाययोजनांमुळे जनता त्रस्त झाली होती. या उपाययोजनांच्या विरोधात टिळकांनी केसरी(मराठी) आणि मराठा(इंग्रजी) वृत्तपत्रात काही मजकूर लिहिला होता.

त्यानंतर 22 जून 1897 रोजी, चापेकर बंधूनी कमिशनर रँड आणि लेफ्टनंट आयर्स्ट या ब्रिटिश अधिकार्याला गोळ्या घालून ठार मारले. ब्रिटिशांनी टिळकांवर यांच्या खुनासाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. यासाठी त्यांना तब्बल 18 महिने तुरुंगवास भोगावा लागला. तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” ही सिंहगर्जना केली. (Lokmanya Tilak Speech in Marathi)

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच Lokmanya Tilak Speech in Marathi

लाल-बाल-पाल:

गोपाळ कृष्ण गोखले हे मध्यम विचारांचे होते. मध्यम विचारांचे असल्यामुळे टिळकांनी त्यांना विरोध केला. या विरोधाला लाल म्हणजे ‘पंजाबचे लाला लजपत राय आणि पाल म्हणजे बंगालचे बिपिनचंद्र पाल यांनी पाठिंबा दिला.

मंडाले येथे टिळकांना तुरुंगवास

30 एप्रिल 1908 रोजी मुझाफ्फ़रपूर मध्ये खुदीराम बोस आणि प्रफुल्ल चाकी यांनी डगलस किंग्सफोर्ड याला मारण्यासाठी त्याच्या गाडीवर बॉम्ब टाकले. यात त्यात प्रवास करणाऱ्या दोन महिलांचा मृत्यु झाला. केसरी या वृत्तपत्रातून टिळकांनी या दोन्ही तरुणांनी केलेल्या कृत्याचे समर्थन केले. याचाच ठपका ठेवून त्यांच्यावर देशद्रोहाचे खटले दाखल केले. यात त्यांना दोषी ठरवण्यात आले आणि त्यांना त्यात सहा वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागला.

तुरुंगात असताना त्यांनी आपले वाचन आणि लेखन सुरु ठेवले. तुरुंगात असताना त्यांनी गीता रहस्य लिहिले. गीता रहस्याच्या प्रती विकून जमलेल्या पैशांचा उपयोग भारतीय स्वातंत्र्य चळवळीसाठी केला. 16 जून 1914 रोजी त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. (Lokmanya Tilak Speech in Marathi)

टिळकांचा मृत्यु

तुरुंगातून सुटल्यानंतर टिळकांना मधुमेहाचा त्रास सुरु झाला. त्यानंतर 1 ऑगस्ट 1920 रोजी टिळकांनी अखेरचा श्वास घेतला. भारतातील लढव्यया क्रांतिकारक गेल्याने भारतभर शोककळा पसरली.

हे वाचा:
यदि मोबाइल न होता तो हिंदी निबंध | yadi mobile na hota to nibandh in hindi 

आमचा हा लेख वाचल्याबद्दल आपले खुप-खुप आभार. आपल्याला Lokmanya Tilak Speech in Marathi हा लेख कसा वाटला हे कमेंटद्वारे कळवा, धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top